Ticker

6/recent/ticker-posts

भोकर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा- राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

भोकर प्रतिनिधी संदिपकुमार गंगासागरे:- आज भोकर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत पक्ष संगठन मजबूत करण्यासाठी चर्चा झाली व पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार साहेब यांचा सोबत खंबीर पणे उभे टाकणार म्हणून सर्वांनी सहमती दर्शवली तसेच यावेळी शहर अध्यक्ष मनून श्री दत्ता पांचाळ यांची निवड करण्यात आली सदर बैठकीला भोकरचे पक्ष निरीक्षक तथा भोकर पंचायत समितीचे माजी सभापती श्री ॲड भाऊसाहेब देशमुख गोरठेकर साहेब, भोकरचे पक्ष निरीक्षक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉ विक्रम देशमुख तलेगावकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री जांभरूनकर सर, ॲड शिवाजी कदम नागापूरकर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोकर व ईतर अनेक पाधादिकरी उपस्थित होते.
बैठक झाल्यानंतर तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसापासून ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे व नदी काठच्या गावातील घरादाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन भोकर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची हेक्टरी ७० हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीतर्फे निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसात सतत मुसळधार पाऊस झाला असल्याने नदी नाल्यांना महापूर येऊन शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस,सोयाबीन,तूर, हळद,मूग,उडीद आदी पिके वाहून गेली.तसेच या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात महापुर येऊन अनेक गावातील घरांना पुराने वेडा दिला त्यामुळे घरात पाणी शिरल्याने शेकडो कुटुंबे उघड्यावर पडली.अनेक घरांची पडझड झाली आहे तेव्हा अशा सर्व पूरग्रस्त गावाची व शहरातील पडझड झालेल्या घरांची पाहणी करून त्वरित पंचनामे करावेत व संबंधितांना आर्थिक मदत देण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली असून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७o हजार रुपये तातडीची मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे भोकर तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस डॉ.विक्रम देशमुख तळेगावकर, श्री डी बी जांभरुणकर, माजी सभापती भाऊसाहेब देशमुख गोरठेकर,तालुका अध्यक्ष ॲड शिवाजीराव कदम तालुका महिला अध्यक्षा सौ.यशोदाताई शेळके, शहर अध्यक्ष दत्ता पांचाळ,दिलीपराव तिवारी,आनंदराव चिट्टे, ॲड.भुजंगराव सूर्यवंशी ॲड. लक्ष्मीकांत मोरे, तोफिक इनामदार,आनंदराव पाटील बोरगावकर, मोहनराव पाटील हसापूरकर, रामलु गोदेवाड,मारोती शेंडगे,गणपतराव मुसळे,तोफिक इनामदार, शे.वकील खैराती,संदीप गंगासागरे,संजय पाटील भोसले चेतन पाटील हाडोळीकर, उमेश पाटील कापसे,बालाजी तेलंग, मिर्झा इसाक बेग, शेख अजिजसाब, शाकेर इनामदार,नब्बु भाई,अविनाश सुर्यवंशी, विकी शेळके, श्याम जैन, संजय पाटील भोसले, संजय पाटील मुद्गुलवाड, धावरीचे चैरमन कोंडीबा कोकने,चेतन पाटील महागावकर, बालाजी नार्लेवाड आदिसह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments