Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र शासनाचे विशेष अभियान व विविध महसूल सेवा अंतर्गत प्रमाणपत्र वाटप

 मातूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या अंतर्गत प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी हे महाराष्ट्र शासनाचे विशेष अभियान असून विविध महसूल सेवा प्रमाणपत्र दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र 8, रहिवाशी प्रमाणपत्र 5, शेत जमीन फेरफार नक्कल, 7/12 होल्डिंग 42,शिधापत्रिका 10, व एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयामार्फत बेबी किट वाटप 01 उपयोगी वस्तू वितरित करण्यात आले व शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करून सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या कामासंबंधी काही अडचनी सोडवण्यासाठीच समाधान शिबिर आहे, यामुळे नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता आपल्या समस्या मांडाव्यात शक्य त्या समस्या याठिकाणीच सोडवण्यात येईल हेच खरे समाधान शिबिराचे फलित असल्याचे प्रतिपादन करण्यात आले तसेच डिजिटल सेवांचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले . तसेच कार्यक्रम संपल्यावर विविध अडचणी एकूण घेऊन सोडविण्यात आले
, यावेळी कृषी विभाग, भूमिअभिलेख विभाग, मुद्रांक विभाग, महसूल विभाग, पुरवठा विभाग,ग्रामपंचायत विभाग यांचे स्टॉल लावण्यात आले, यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी तहसीलदार, तथा परिविक्षाधीन तहसीलदार अभयराज नंजुंडे, या कार्यक्रमावेळी खडकीचे सरपंच तरंगे , पोलीस पाटील,मातुल/पिंपळढव, खडकी, रहाटी बू., प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते, यावेळी प्रवीण जाधव मंडळ अधिकारी मातुल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तसेच सूत्र संचलन रेखा मांडगीलवर ग्राम महसूल अधिकारी दिवशी बू यांनी केले, आभार प्रदर्शन रुपेश जाधव ग्राम महसूल अधिकारी मातुल यांनी केले, यावेळी ग्रामहसुल अधिकारी प्रकाश बड्डेवाड, माधव मेतववाड, प्रियंका बडूरे , पुरवठा विभागाचे आकाश गड्डापोड, महिला बालविकास प्रकल्पाचे अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, कृषी सहायक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका सरपंच,माजी सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, अनेक शेतकरी बांधव व महसूल सेवक, रामदास मूतनेपवाड, किशोर जगदंड, राहुल कदम हे हजर होते.

Post a Comment

0 Comments