Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020- एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

(भोकर संदिपकुमार गंगासागरे) : भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने *"राष्ट्रीय शैक्षणिक सप्ताहा"* निमित्य *राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020* या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी वक्ते म्हणून स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेड येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. विकास सुकाळे यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापक यांची भूमिका फार महत्वाची आहे असे प्रतिपादन केले. तसेच या धोरणांमध्ये शालेय स्तर, महाविद्यालय स्तर यांची विभागणी, पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रमाची रचना, परिक्षेचे स्वरूप यावर चर्चा करण्यात झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 च्या अंमलबजावणीच्य अनुषंगाने महाविद्यालयाची व प्राध्यापकांची
भूमिका कशी असावी या बद्दल मत व्यक्त केले. तसेच ग्रामीण स्तरावर या शैक्षणिक धोरणाची अंमल बजावणी करताना येणाऱ्या अडचणी यावेळी सरांनी बोलताना सांगितल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुकुंद येगांवकर यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. जयवर्धन बलखंडे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. राधाकिशन होगे यांनी केले. या कार्यशाळेचे आयोजन सांस्कृतिक विभाग व य. च. म. मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र भोकर यांनी केले होते. सदरील कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments