Ticker

6/recent/ticker-posts

भोकर येथील बिंदू महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन

(भोकर प्रतिनिधी) दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर येथे दि. 7 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता कला,वाणिज्य, विज्ञान शाखेतील बारावी,पदवी,पदव्युत्तर 50% गुण प्राप्त विद्यार्थ्यांना ही रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी पुणे येथील ग्लोबल आऊट सोर्सीग ट्रेनिंग सर्विस नामांकित कंपनीकडून ही संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कॅम्पस मुलाखतीसाठी येतांना
1) आधार कार्ड 2) बायोडाटा 3) पॅन कार्ड 4) पासपोर्ट साईज फोटो घेऊन उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्यासाठी जास्ती जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंजाबराव चव्हाण, समिती प्रमुख डॉ.रामचंद्र भिसे, डॉ.अरविंद चव्हाण, प्रा.पंडित एस.एन, डॉ.नेम्मानीवार भूपेश, डॉ. फेगडे माधव, डॉ.बरदाळे शितल, डॉ.पंकज हाके यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments