भोकर तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सूचित करण्यात येते की, बदलती राजकीय परिस्थिती व पक्ष संगटन मजबूत करण्यासाठी भोकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वतीने दिनांक 29/07/2023 रोजी सकाळी 11 वाजता रेल्वे स्टेशन रोड, दुयम निबंधक कार्यालयाचा बाजूला भोकर येथे बैठक आयोजित केली आहे .

सदर बैठकीला भोकरचे पक्ष निरीक्षक तथा भोकर पंचायत समितीचे माजी सभापती श्री ॲड भाऊसाहेब देशमुख गोरठेकर साहेब, भोकरचे पक्ष निरीक्षक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉ विक्रम देशमुख तलेगावकर साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री जांभरूनकर सर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा भोकर विधानसभा अध्यक्ष श्री प्रमोद देशमुख कामनगावकर, जिल्हा चिटणीस श्री आनंद चिटे बोरगांवकर हे उपस्थित राहणार आहेत तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्ीय अध्यक्ष मा.खा. श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर प्रेम करणारे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीसदर बैठकीला उपस्तीत राहावे असे आव्हान नूतन तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भोकर चे तालुका अध्यक्ष एडवोकेट शिवाजीराव कदम यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
0 Comments