भोकर प्रतिनिधी :
दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि.27/07/2023 रोजी "निसर्गाची शाळा व पर्यावरण पूरक उपक्रम" या विषयावर एकदिवसीय उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून 'निसर्गाची शाळा" चे संस्थापक श्री. अण्णासाहेब जगताप हे होते. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रशांत टाके यांनी या शिबिराचे प्रास्तविक करताना अशा कार्यक्रमांची प्रसंगीकता विशद करून मार्गदर्शकांचा परिचय करून दिला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जगताप यांनी सुरवातीला त्यांच्या शेतमालाला प्रतिष्ठा मिळवून देणारे झेंडूची फुले अभियान, एक मूल तीस झाडे अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती आपल्या खास मनोरंजक शैलीत दिली. पुढे बोलताना ऑनलाइन व ऑफलाईन अशा दोनही पद्धतींनी त्यांची निसर्गाची शाळा कशी चालते या विषयी विवेचन केले. विद्यार्थी, शिक्षक, आणि समाजातील विविध घटकांना सामावून घेऊन त्यांच्या श्रमदानातून या शाळेद्वारे चालवले जाणारे घरच्या घरी रोपवाटिका, दीर्घ काळ टिकणारी देशी फळ झाडे लावणे, रानभाज्या ची परसबाग तयार करणे, मातीचा गणपती, विवाह व तत्सम सोहळ्यात रोपं भेट देणे असे विविध पर्यावरण पुरक जीवन शैली निर्माण करणारे तब्बल पासष्ठ उपक्रम कसे चालतात याची विस्तृत चर्चा केली. शिबिराच्या शेवटच्या टप्यात त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना रानभाज्या आणि फळ झाडांच्या बिया भेट देऊन त्यांची लागवड आणि जोपासना कशी करावी याबद्दल माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखविले. प्राचार्य पंजाब चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. शिबिराच्या समारोपात डॉ. हनुमंत जवळगे यांनी आभार प्रदर्शन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.
0 Comments