Ticker

6/recent/ticker-posts

मंत्रिमंडळात लवकरच स्थान द्या नाही तर नाईलाजास्तवस्वतःचा पक्ष काढावा लागेल : लक्ष्मण पाटील सोनारीकर

गेल्या काही दिवसापासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी असणारे भोकर तालुक्याचे भूमी पुत्र लक्षम पाटील सोनारिकर हे आपले लक्ष वेधून घेण्यासाठी भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांची विविध प्रश्न तसेच बारड ते रहाटी रोड, शेतकऱ्यांना पीक विमा, बी-बियाणांची चौकशी, पिंपलढव तलावाचा प्रश्न अशा विविध प्रकारचे प्रश्न शासन स्तरावर नेऊन त्या सोडविण्याचे काम करत आहेत .

पण त्यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांच्या कार्य कर्त्यात  नाराजीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रश्नांची जोर धरून मंत्रिमंडळात तात्काळ स्थान देण्याची मागणी केली आहे जर मंत्रिमंडळात मला स्थान दिले नाही तर मला नाईलाजास्तव स्वतःचा पक्ष उभारावे लागेल व त्याचा परिणाम इतर पक्षांना होईल .
तर आता निवडणुकीच्या रिंगणात असलेले पक्ष लक्ष्मण पाटील सोनारिकर यांना मंत्रिमंडळ स्थान देतील का? व त्यांना नवीन पक्ष करण्यापासून परावृत्त करतील का याकडे आता भोकर तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments