Ticker

6/recent/ticker-posts

लक्ष्मण पाटील सोनारिकर यांना बिलोलीतून विधानसभेचे तिकीट देण्याची जनतेकडून मागणी

लक्ष्मण पाटील सोनारिकर हे मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची विविध प्रश्न त्यांच्या समस्या जाणून घेऊन ते शासनस्तरावर  घेण्याचे कार्य प्रभावीपणे करत आहेत त्यामुळे जनतेतून आपला शेतकऱ्यांचा एक तरी नेता विधानसभेवर गेला पाहिजे यामुळेच जनतेनी लक्ष्मण पाटील सोनारिकर यांना बिलोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवा व पक्षांनी त्यांच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना तिकीट द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे 

लक्ष्मण पाटील सोनारिकर हे  मूळचे मौजे सोनारी या गावचे रहिवासी असून त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध सामाजिक कार्य केले असून त्यामध्ये त्यांनी पिक विमा असो किंवा रोडचे प्रश्न असो असे विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत व त्याचा पाठपुरावा शासनाकडे केलेला आहे त्यामुळे जनतेची अशी मागणी आहे की ते विधानसभेसाठी इच्छुक असून त्यांना कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे

Post a Comment

0 Comments