भोकर (संदीपकुमार गंगासागरे) भोकर मधील समता नगर येथे राहणारी पीडित मुलगी हिने दिनांक 1/8/2019 रोजी पोलीस स्टेशन भोकर येथे येऊन आरोपी प्रकाश राठोड यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला व सदर अत्याचारासाठी माझी आईने सुद्धा मदत केली व प्रकाश राठोड यांनी माझ्या सोबत शारीरिक संबंध केली अशी फिर्याद भोकर पोलीस स्टेशन ला दिली व सदर फिर्यादीवरून भोकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 231/2009 कलम 3(1)(R), 3(1)(s), 3(2)(Y) ॲट्रॉसिटी कायदा व कलम 376(2)(1)(N), 506, 34 भा. द.वि. व सहकलम 4, 6, 12 पोस्को कायद्याप्रमाणे आरोपी प्रकाश राठोड व पीडितेची आई तिच्यावर गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी बी. मुदिराज यांनी ककरून प्रकरण विशेष पोस्को खटला 14/2019 नुसार न्यायालयात चालवले. आरोपी हे दिनांक 02/08/2009 पासून कारागृहात होता.
सदर प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासले विशेष म्हणजे सदर प्रकरणात पीडितेची साक्ष घेणारे न्यायाधीश तळेकर मॅडम यांची पण साक्षी दिली होती, परंतु सातही साक्षीदाराच्या पुराव्यात आरोपीविरुद्ध कोणताही पुरावा आला नाही पीडितेच्या साक्षात सुद्धा कोणताही पुरावा आरोपीविरुद्ध आला नाही म्हणून त्याचा फायदा आरोपीला झाला व सदर प्रकरणातून आरोपी प्रकाश रामजी राठोड
रा. हरी तांडा धानोरा तालुका भोकर व तिची आई यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एम एस शेख यांनी दिनांक 12 5 2019 रोजी निर्दोष मुक्तता दिली. सदर प्रकरणात आरोपी मार्फत भोकर येथील प्रसिद्ध ऍडओकॅटे शिवाजी कदम नागापूरकर यांनी प्रभावीपणे भक्कमपणे बाजू मांडून सदर प्रकरणात लेखी युक्तिवाद दिला व आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.
0 Comments