Ticker

6/recent/ticker-posts

5G च्या सेवेसाठी AirTel सज्ज

आपण गेल्या काही वर्षात विना ड्रायव्हरच्या वाहनांविषयी, AR-VR संवाद साधनांविषयी, क्लाउड गेमिंग विषयी बरंच ऐकलं आहे. पण या टेक्नॉलॉजी कितीही परफेक्ट आणि आशावादी वाटत असल्या तरी त्यांचा निभाव काही लागत नाहीये? यामागचं एक कॉमन कारण तुम्हाला माहितेय का? बरोबर! इंटरनेटचा स्पीड! पण आता काळजी करण्याची गरज नाही. लवकरच 5G ची प्रवेशासह इंटरनेटचं विश्व अपडेट होणार आहे. 


     इतकंच कशाला, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं स्मार्टफोन मार्केट म्हणजे भारत 5Gच्या लाँचसाठी सज्ज झाला आहे. यासोबतच  LIVE 5G  सेवांचा प्रयोग करून दाखवणारी Airtel ही भारतातील पहिली टेलिकॉम कंपनी ठरली आहे. हैदराबाद मधील व्यवयसायिक नेटवर्कमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे. डिजिटल भारताचं भक्कम भविष्य ठरणारा हा प्रयोग अनेक सेवा सुविधा घेऊन येणार आहे. तुम्हालासुद्धा याविषयी उत्सुकता वाटतेय ना? चला तर मग आम्ही आपल्याला आणखीन अशी पाच कारणं सांगतो की ज्यामुळे तुमची उत्सुकताआणखीन वाढेल.

1. Lag-free VR Gaming (विना व्यत्यय VR गेमिंग) :-

जगभरात कुठेही राहणाऱ्या मित्रांसह व्हर्च्युअल गेम खेळण्याची कल्पना करा - कल्पना कशाला आपण हे खरोखर लवकरच करु शकणार आहात!
व्हर्च्युअल रिऍलिटी (VR) ही आधीपासूनच उपलब्ध आहे, परंतु मर्यादित इंटरनेट क्षमतांमुळे त्याचा वापर सर्वसामान्यांना करता येत नाही. VR गेमिंगच्या विना अडथळा घेता येणाऱ्या अनुभवासाठी सुपर-लो लेटेन्सीसह हाय-स्पीड इंटरनेटची आवश्यकता असते आणि 5G मुळे ते नक्कीच शक्य होईल. 5G ने मिळणारा दहा पट अधिक उत्तम इंटरनेट स्पीड हा तुम्हाला लोडींगमध्ये वाट पाहण्यासाठी लागणारा वेळ दहा पट कमी करू शकेल. प्रत्यक्षात, Airtelच्या चाचणीतही डायनॅमिक स्पेक्ट्रम शेअरींग (त्याच स्पेक्ट्रमवर 4G आणि 5G सेवा दोन्ही) तपासून पहिल्या गेल्या होत्या, यात टेल्को 310 एमबीपीएसपर्यंत वेग पोहोचवू शकला. एकदा 5G साठी विशेष स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्यास, ही गती आणखीन वाढेल.

2. स्वयंचलित वाहनांची रेलचेल :-

स्वयंचलित वाहनांसाठी 5G हा एक मोठा आणि अत्यंत फायदेशीर अपडेट असणार आहे.  या वाहनांच्या सुरळीत कार्यासाठी, वाहतुकीदरम्यान धोका ओळखून त्यानुसार काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंटरनेट डेटा आवश्यक असतो. 5G ची स्पीड ही 1 ms इतकी वेगवान असल्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेतील वेळा बराच कमी होणार आहे. त्यामुळे ही वाहने प्रत्यक्ष ड्रायव्हरपेक्षाही अधिक वेगाने धोका ओळखून त्यानुसार रिऍक्ट करू शकतील. या कार योग्यरीतीने कमांड देऊ शकतील, संवाद साधू शकतील ज्यामुळे एकूण प्रवास आणखीन सुरक्षित होईल निश्चित! कोणत्या मार्गावर किती ट्रॅफिक आहे आणि वाहतुकीसाठी कोणता मार्ग अधिक सोप्पा आहे हे ओळखणेही या कार्सना शक्य होणार आहे.

3. विना अडथळा ऑनलाईन एंटरटेनमेंट :-

तुम्हाला आठवतंय का जेव्हा 4G भारतीय मार्केटमध्ये आलं होतं तेव्हा स्ट्रीमिंग हा शब्द कसा झटक्यात ट्रेंड झाला होता. ऑनलाईन कंटेंट मग ते म्युझिक असो वा टीव्ही शोज सगळं काही आपल्या वेळेनुसार कुठेही बघण्याची सोय या नेटवर्कने शक्य झाले आहे. याच प्रमाणे आता ऑनलाईन एंटरटेनमेंटमध्ये 5G नेटवर्क एक अनोखा अपडेट नक्की घेऊन येईल. नेटवर्क स्पीड आणि एकत्रित क्षमतेमुळे लोंडिंगसाठी वेळ न दवडता आपण 4K आणि 8K दर्जाचे व्हिडिओज पाहू शकाल. इतकंच नव्हे तर तुमच्या आवडत्या शोजचे पूर्ण सीझन अवघ्या एक ते दोन मिनिटात डाउनलोड करणे सुद्धा शक्य होईल. या सगळ्याचा पुरावा म्हणजे Airtel ने केलेल्या चाचणीत अगदी म्युट स्पीडमध्येसुद्धा 1GB फाईल अवघ्या 45 संकेदात आम्ही डाउनलोड करून पाहिली आहे.

4. आता अंतर करा गायब :-

5Gमुळे एक सक्षम आणि वेगवान नेटवर्क आपल्याला उपलब्ध होईल ज्याने अगदी कोणत्याही कानाकोपऱ्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसारख्या सुविधा वापरता येतील. तुम्ही जी कामं तुमच्या ऑफिसच्या किंवा घरच्या Wifi स्पीड वर करत होतात ती सर्व कामे आता 5G सह मोबाईल वरून आणि कोणत्याही दुर्गम भागातून सुद्धा करता येऊ शकतील. यात सुद्धा व्हिडीओच्या गुणवत्तेत तुम्हाला कोणतीही तक्रार उरणार नाही. या सुविधेमुळे अगदी गावाकडील भागातून आणि अधिक वेगाने काम करता येणार असल्याने तुमच्या कुटुंबाला वेळ देणे आता अगदीच शक्य होणार आहे

5. घरातूनच करा शॉपिंग :-

   अलिकडे अनेक दुकानांनी ऑगमेंटेड रिऍलिटी (AR) वर आधारित ऍप्लिकेशन सुरू केली आहेत. यामुळे ग्राहकांना ते प्रोडक्ट आपल्या घरी कसं दिसेल हे पाहून मग खरेदीचा निर्णय घेता येतो. 5G नेटवर्कमुळे ही प्रक्रिया बरीच वेगवान होईल, इतकंच कशाला तर ग्राहकांना कपडेसुद्धा व्हर्च्युअली ट्राय करता येऊ शकतील. 5G मुळे मोठ्या प्रमाणात डेटा वापरता येणार असल्याने मोबाईलची सर्वच कामे ही क्लाउड मार्फत करता येतील आणि अगदी साध्या स्मार्टफोन मध्ये सुद्धा सगळे फीचर वापरता येऊ शकतील. 
     थोडक्यात काय तर 5G मुळे इंटरनेट हा आपल्यासाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे. आजवर इंटरनेटच्या प्रत्येक अपडेटमुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यात मोठे बदल आणले आहेत आणि 5G सुद्धा याला अपवाद नसेल. जोवर Airtel हे नवं 5G अपडेट तुमच्यासाठी घेऊन येतंय तोवर तुम्ही कशामुळे सर्वात जास्त उत्साही आहात हे ठरवा.

Post a Comment

0 Comments