Ticker

6/recent/ticker-posts

आष्टूर ग्रामपंचायत सरपंच पदी रेखा दत्तराव ससाणे तर उपसरपंचपदी बाबासाहेब बाबर यांची बिनविरोध निवड..!


लोहा (संदिप गंगासागरे)
            लोहा तालुक्यातील विधानसभा क्षेत्रासाठी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या आष्टुर या ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे लोहा कंधार विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली 2021 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक पार पडली यामध्ये ग्रामसमृद्धी विकास पॅनल आष्टुर या पॅनलच्या प्रचंड बहुमताने विजय झाला तरी आष्टूर ग्रामपंचायत सरपंच पदी रेखा दत्तराव ससाणे तर उपसरपंचपदी बाबासाहेब देवराव बाबर यांची बिनविरोध निवड झाली आहे

लोहा तालुक्यातील 84 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या असुन दिनांक 8 ते 12 या कालावधी मधील तीन टप्यात सरपंचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक 10 फेब्रुवारी रोजी आष्टूर येथील सरपंच व उपसरपंच पदाचा कार्यक्रम पार पडला ही ग्रामपंचायत 11 सदस्यांची असुन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोहा कंधार विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल प्रमुख राम पवार मा. सरपंच तुकाराम बाबर मा. सरपंच मधुकर बाबर यांच्या नेतृत्वाखाली ग्राम समृद्धी विकास पॅनलचा प्रचंड बहुमताने विजय झालाऔपचारिक रित्या दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सरपंच निवड कार्यक्रम जाहीर झाला.
दिनांक 10 फेब्रुवारी सरपंच, उपसरपंच पदासाठी आष्टुर ग्रामपंचाय निवडणूक प्रक्रिया चालू असताना ग्रामसमृद्धी विकास पॅनल आष्टूरच्या वतीने सरपंच पदासाठी रेखा दत्तराव ससाणे तर उपसरपंच पदासाठी बाबासाहेब देवराव बाबर यांचे अर्ज आले असता पीठासन अधिकारी तथा विस्तार अधिकारी डी.पी.धर्मेकर यांनी सरपंच पदी रेखा दत्तराव ससाणे तर उपसरपंचपदी बाबासाहेब देवराव बाबर यांची निवड बिनविरोध  पणे जाहीर करण्यात आली तर विरोधकांकडे बहुमत नसल्याने दोन सदस्य उपस्थित होते तर एक गैरहजर होता.

यावेळी नवनिर्वाचित सरपंच रेखा दत्तराव ससाणे तर उपसरपंच बाबासाहेब देवराव बाबर यांचा सत्कार ग्राम समृद्धी विकास पॅनल आष्टूर चे
प्रमुख केशवराव भुजंगराव बाबर मा. (सभापती लोहा )राम पवार मा. सरपंच तुकाराम बाबर मा. सरपंच मधुकर बाबर यांनी केला तर यावेळी उपस्थित  दत्तराव बाबर, संजय बाबर, पोलीस पाटील संतोष शिंदे, गणेश राठोड, अनिल बाबर, ज्ञानेश्वर बाबर, अनिल बाबर, राजेभाऊ बाबर, अप्पाराव बाबर, राजाराम बाबर, शिवाजी गुद्दे, तुकाराम बंडे, बाळू खेडकर, राम बंडे, बापूराव गोटमुकले, नारायण गोडबोले, आबाजी सासणे, गंगाधर सासणे, शिवाजी डावरे, जगदीश ससाणे, बापूराव सासणे, दत्तराव ससाणे आधी गावकरी उपस्थित होते अशी माहिती नंदकुमार सासणे यांनी दिली आहे.

इतर बातम्या वाचनासाठी होम बटन वर क्लिक करा

Post a Comment

0 Comments