नांदेड : प्रतिनिधी
भोकर येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे कार्यकर्ते संदिप गंगासागरे यांची 21 फेब्रुवारी रोजी ॲडव्होकेट शिवाजी कदम यांच्या शिफारशीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे भोकर तालुका अध्यक्ष म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री, कपिल जुनेकर यांनी दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे की, पक्ष बळकट करण्यासाठी तसेच फुले-शाहू-आंबेडकर व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार जनसामान्यात पोचवण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सहकार्य राहील आणि पुढे म्हटले आहे की, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयदेव अण्णा गायकवाड साहेब व प्रदेश उपाध्यक्ष पंडितराव कांबळे साहेब यांच्या आदेशाने आपली निवड करण्यात येत असल्याचे दिलेल्या निवड पत्रामध्ये नमूद करण्यात आले असून संदिप गंगासागरे यांच्या निवडीबद्दल रवी रवि गेंटेवार, सिद्धू पाटील चिंचाळकर आनंद पाटील चिठे बोरगावकर, यशोदाबाई शेळके, उमेश कापसे बटाळकर आनंद पाटील हसापूरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच शोषल मीडियावरही त्यांचे जोरदार अभिनंदन केले जात आहे.
यासह इतर बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या होम वर क्लिक करा
0 Comments