नांदेड : (प्रतिनिधी )
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियात निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवीत व्यंकट विश्व्नाथराव बारमाळे ने ७९. ३८ % टक्के गुण प्राप्त करून सर्वप्रथम तर सूचिता जोगदंड द्वितीय आणि कैलास गायकवाड ने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
माध्यम शास्त्र संकुलात चालणाऱ्याम जनसंवाद आणि पत्रकारिताया पद्व्युत्तर अभ्यासक्रमाचे निकाल नुकताच जाहीर झाले यात संकुलातील सर्वच विध्यार्थ्यानी उत्तम कामगिरी करत बी + मुल्याकंन प्राप्त केले आहे, सदर विषयाचे अभ्यासक्रम हे प्रात्यक्षिक आधारित आहे आणि या लॉक डाउन च्या भीषण परिस्थितीही विदयार्थ्यांनी अतुलनीय कामगिरी बजावली आहे. नियमित पणे ऑनलाईन मार्गदर्शन आणि मागील वर्षी संकुलात केलेल्या प्रात्यक्षिक कार्यामुळे शक्य झाल्याची ग्वाही सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्यानी दिली .
यप्रसंगी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ उद्धव भोसले, प्र कुलगुरु डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. रवि सरोदे संकुलाचे संचालक प्रो . डॉ . दीपक शिंदे यांनी उत्तम गुण प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर डॉ राजेंद्र गोणारकर , डॉ सुहास पाठक , डॉ . सचिन नरंगले , डॉ कैलाश भा. यादव , राहुल पुंडगे , अनुजा बोकारे आदींनी त्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत
0 Comments