Ticker

6/recent/ticker-posts

कर्तव्यासह सामाजिक भान ठेवून अनेक गरजूंना मदत केल्याचा आनंद सर्वश्रेष्ठ आहे - न्यायमूर्ती शेख

भोकर : (रमेश गंगासागरे )  कर्तव्य बजावताना असे आढळून आले की समाजात अनेक व्याधीने नागरिक ग्रासले आहेत वृद्ध माता-पित्यांच्या देखभालीकडे अनेक मुले-मुली दुर्लक्ष केल्याचे अनेक प्रकरणात मला आढळून आले आहे, त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून मी त्यांची काही प्रमाणात का होईना मदत करण्याचे ठरवले आणि आतापर्यंत 35 अतिगंभीर नागरिकांना मुंबई पुणे औरंगाबाद येथील मोठमोठ्या दवाखान्यांमध्ये उपचारासाठी पाठवले आहे, त्यानंतर भोकर येथे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या प्रमाणात घेण्यात आले, त्यात 155 लोकांना चष्म्यांचे आणि 850 नागरिकांना औषधींचे मोठ्या प्रमाणावर मोफत वाटप करण्यात आले होते, अशा लोकांची मी कर्तव्यसह सामाजिक भान ठेवून अनेक गरजूंना मदत केल्याचा मला आनंद सर्वश्रेष्ठ होत असल्याचे प्रतिपादन भोकर येथील जिल्हा न्यायाधीश श्री एम.एस.शेख यांनी लोकअदालतीच्या उद्घाटनपर कार्यक्रमात अध्यक्षपदावरून केले.
       
       आज सकाळी 10 वा. दिनांक 17 मार्च रोजी भोकर न्यायालयामध्ये भव्य लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते,  यावेळी न्यायमूर्ती श्रीपांडे सर, न्यायमूर्ती पठाण सर,  न्यायमूर्ती त्रिभुवन सर,  न्यायमूर्ती सौ तळेकर मॅडम यांच्यासह एडवोकेट कुंटे, एडवोकेट खाडे, एडवोकेट शिवाजी कदम, पत्रकार व नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती न्यायमूर्ती एम एस शेख पुढे बोलताना म्हणाले की राजस्थान येथील मेंढपाळाचे तीन महिन्यापूर्वी मोठे नुकसान झाले होते आणि या मेंढपालास पोटातील आतड्यांचा गंभीर असा कॅन्सरचा दुर्धर आजारही झाला होता, म्हणून ही केस मी तीन महिन्यांमध्ये सोडवून मेंढपाळस न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी तर्फे 5 लक्ष 17 हजार रुपयांची मदत कंपनीचे मंडळ प्रबंधक सौ मांडवेकर आणि श्री राहेरकर यांच्या हस्ते आज मेंढपालास धनादेश प्रदान करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, याच वेळी लोक अदालतीमध्ये विष्णू वर्धन मोरे ह्या दहा वर्ष वयाच्या मुलास शासकीय खर्चाने इलाजासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे यास मानवतेच्या दृष्टिकोनातून गरज पडल्यास आणखीन मदत करण्यासाठी भोकर ची विधी सेवा समिती कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
       आज होत असलेल्या लोकअदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रकरणे दिवाणी न्यायालयाचे प्रकरणे,  स्टेट बँक ऑफ इंडियातील प्रकरणे,  एम एस ई बी आणि भारतीय दूरसंचार विभागातील प्रकरणे यासह फौजदारी व दिवाणी स्वरूपातील प्रकरणे सामंजस्याने मिटवून घेण्याचे आव्हान न्यायमूर्ती एम एस शेख यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ॲडव्होकेट शिवाजी कदम यांनी केले.

Post a Comment

0 Comments